लिंगराज स्वायत्त महाविद्यालय हिंदी विभागातर्फे पुस्तक दिन
बेळगाव : हर घर तिरंगा अभियानाप्रमाणे हर घर अपना ग्रंथालय अभिमान विद्यार्थ्यांनी चालवावे, प्रत्येक उत्सवाला शुभवस्तूंची खरेदी करताना शुभवस्तू म्हणून पुस्तक खरेदीचा विचार व्हावा, पुस्तकांशी मैत्री करून अनेक पुस्तकांचे वाचन करा, असे विचार किशोर काकडे यांनी व्यक्त केले. केएलई सोसायटीच्या लिंगराज स्वायत्त महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी पुस्तकांचे महत्त्व सांगून अरूणिमा सिन्हा यांच्या एव्हरेस्ट की बेटी या हिंदी कादंबरीचा परिचय करून दिला. स्वागत प्रा. अर्जुन कांबळे यांनी केले. याप्रसंगी प्रा. सीमा जनवाडे, डॉ. कलावती निंबाळकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन नक्षता कुलकर्णी हिने तर सुहानी चिकोनने आभार मानले.









