न्हावेली / वार्ताहर
विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कोणत्याही दाखल्या संदर्भात किंवा शासकीय कामासंदर्भात प्रशासनाने त्वरित सहकार्य करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतेही अडथळे येणार नाहीत. व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी सावंतवाडी तहसिलदार श्री पाटील यांच्याकडे केली . श्री. पाटील सावंतवाडी तहसिलदार पदी कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर मनसेच्या वतीने स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील विविध समस्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आल्या. तर श्री पाटील यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी म.न.वि.से चे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, निलेश मुळीक, शुभम घावरे, प्रमोद तावडे ,मनोज कांबळी ,प्रणित तळकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.









