बेळगाव प्रतिनिधी – पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्याने कॉलेज विद्यार्थ्यांनी जल्लोश केला. फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाची उधळण करत परीक्षा झाल्याचा विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे सर्वच महाविद्यालयांसमोर हा उत्साह दिसून आला.
बीकॉम तृतीय वर्षाची अंतिम परीक्षेचा शेवटचा पेपर शुक्रवारी झाला. सर्व पेपर सुरळीत गेल्यामुळे परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोश केला. महाविद्यालयानी कॉलेज परिसरात जल्लोश करण्यास परवानगी दिली नसल्याने कॉलेज आवाराबाहेर हा जल्लोश सुरू होता. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून विद्यार्क्षी आनंद साजरा करत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









