वार्ताहर /खानापूर
बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या जपान शोटोकॉन खुल्या कराटे स्पर्धेत तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचालित शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्पर्धेत देशभरातून 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात शांतीनिकेतन स्कूलच्या 14 विद्यार्थ्यांचा समावेश होता. कटाजमध्ये तीन फेऱया जिंकून गौतमी कुलकर्णी, श्रावणी पाटील यांनी रौप्य व कांस्यपदक पटकावले तर कुमटेमध्ये सृष्टी गुरवने सुवर्ण व विद्या गोडसेने रौप्य मिळविले. मुलांच्या गटात प्रथमेश गुरव, कौस्तुभ पाटील यांनी रौप्य पदक मिळवले. या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्राचार्या स्वाती कमल वाळवे, आंतरराष्ट्रीय कराटे शिक्षक मधू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कराटेमध्ये चॅम्पियनशिप मिळवलेली खानापूर तालुक्मयातील ही पहिली शाळा आहे. या यशाबद्दल शांतीनिकेतन पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.









