सांगेली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची होणार सोय
ओटवणे प्रतिनिधी
सांगेली पंचक्रोशीसाठी शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) चित्रकला परीक्षा केंद्र मंजूर झाले असुन या परीक्षा केंद्राचा शुभारंभ सांगेली सरपंच लवू भिंगारे यांच्याहस्ते करण्यात आला. सांगेली माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हे परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
यावेळी सांगेली माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे यांनी या ठिकाणी परीक्षा केंद्र मंजूर झाल्यामुळे सांगेली पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक नुकसान तसेच त्यांना सावंतवाडी येथे जा-ये करण्यासाठी लागणारा वेळ व दमछाक या सर्वांपासून मुक्तता झाली आहे. तसेच या ठिकाणी दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राबरोबर चित्रकला परीक्षा केंद्र मंजूर झाल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांची एकाच ठिकाणी जवळ सोय झाल्याचे सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, गिरीजानाथ ग्रामविकास मंडळाचे सेक्रेटरी विश्वनाथ राऊळ, पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे, उपसरपंच संतोष नार्वेकर, सांगेली तंटामुक्ती अध्यक्ष वामन नार्वेकर, शिरशिंगे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राऊळ, कलंबिस्त हायस्कूलचे कलाशिक्षक श्री सावंत, माडखोल हायस्कूलचे शिक्षक श्री मोहिते, आनंद राऊळ, जवाहर नवोदय विद्यालयाच्या सौ पाटील, हनुमंत नाईक, श्री जाधव, श्री गावडे, परीक्षा केंद्र प्रमुख श्री कोंडये, प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. घावरे, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परीक्षार्थी उपस्थित होते.









