मालवण : वार्ताहर
मालवण तालुक्यातील ‘ओझर विद्यामंदिर कांदळगाव’ प्रशालेतील विद्यार्थिनींनी तन्वी कुराडे आणि वैष्णवी आंगणे शाळेकडे चालत येतं असताना रस्त्यावर एक जखमी चिमणी तडफडत असताना आढळली. निरीक्षण केल्यावर त्यांना ती चिमणी जखमी असल्याचे आढळले. विद्यार्थ्यीनींनी त्या जखमी चिमणीला शाळेमध्ये आणले. आणि शिक्षकांना सर्व हकीकत सांगितली. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थिनींनी त्या चिमणीला पाणी पाजले. चिमणीच्या जखम झालेल्या भागावर हळद लावून चिमणीची सुश्रुषा केली. चिमणीला अभय मिळाले. सेवा करूनही चिमणी दिवसभरात उडू शकली नाही, म्हणून इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली तृप्ती दीपक परुळेकर या विद्यार्थिनीने त्या चिमणीला घरी नेऊन तिची पुन्हा सेवा केली. तिच्या प्रामाणिक सेवेला यश मिळाले. सकाळपर्यंत त्या चिमणीला बरे वाटताच चिमणी नैसर्गिक अधिवासात स्वतः उडून गेली. आपल्या प्रयत्नांमुळे चिमणी उडून गेल्याची पाहताच तृप्तीचे मनही तृप्त झाले. ‘प्राणीमात्रांवर प्रेम करावे’ हे वचन प्रत्यक्षात अमलात आणल्याबद्दल तृप्ती परुळेकर, तन्वी कुराडे आणि वैष्णवी आंगणे या विद्यार्थिनींचे ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Previous Articleकळंब्यातील गळतीमुळे खोदलेला खड्डा बनला जीवघेणा; खड्ड्यात पडून विद्यार्थी गंभीर जखमी; ग्रामपंचयातीच्या हलगर्जीपणाचा फटका
Next Article पाण्याच्या निच-याची योग्य सोय करावी
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg