शाळेजवळील गटारे साफ करा, रोडरोमियोंना आवरा अशा समस्या मांडल्या
प्रतिनिधी / म्हापसा
कळंगूट पंचायतीची पहिली बाल ग्रामसभा 25 जून रोजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. कळंगूट परिसरातील विद्यार्थ्यांनी या ग्रामसभेत भाग घेऊन आपल प्रश्न विचाऊन निरसन कऊन घेतले. काही युवक शाळेत जाण्याच्या वाटेवर बसून खुलेआम दाऊ, सिगारेटचे सेवन करतात. पर्यटकही खुलेआम दाऊ पितात. शाळेत जाताना हे दृश्य पाहायला मिळते व वेगळे विचार करायला भाग पाडतात, अशी माहिती विद्यार्थ्यांनी कथन केली. याकडे पोलीस खाते दुर्लक्ष करते मात्र हा विषय गांभिर्याने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच गीता परब, पंच स्वप्नेश वायंगणकर, सावियो गोन्साल्वीस, सुनिता मयेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक बशीर मुल्ला व सचिव अर्जुन वेळीप उपस्थित होते.
शाळेजवळील गटारे साफ करा
एका हायस्कूलच्या पाठी मागील गटार नादुऊस्त आहे. सर्व सांडपाणी बाहेर येते व शाळेभोवती दुर्गंधी पसरते. याची पंचायतीने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थिनी रिया कवी हिने केली. काही रोडरोमियो रस्त्यावर दाऊ पिऊन दंगामस्ती व छेडछाड करतात याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी बाल ग्रामसभेत करण्यात आली. क्रीडा मैदानावर योजना बरोबर नाही, स्कूलमध्ये पाण्याची योग्य सोय नाही, लिहिण्याचा बोर्ड नीट नाही तसेच शाळेमध्ये शौचालयाची चांगली सोय नाही, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
मुलांच्या समस्यांकडे पंचायत गांभिर्याने लक्ष देणार : जोसेफ सिक्वेरा
यावेळी सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेतील आपापल्या समस्या या ग्रामसभेत मांडल्या. आम्ही त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. काही शाळांमध्ये गाड्या आहेत मात्र त्यांना चालक नाही, त्यांना पंचायत चालक पुरविणार असल्याचे स्पष्ट केले. काही शांळामध्ये वॉटर प्युरीफायर बसविणार तसेच ट्राफिक वॉर्डनची सोय करण्यात येणार आहे. पंचायत फंडातून जे काही करणे शक्य आहे ते सर्व मुलांना पुरविण्यात येईल, असे जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.
कोणत्याही गुह्याबाबत पोलिसांना हाक मारा : प्रगती मळीक
पोलीस उपनिरीक्षक प्रगती मळीक यांनी, शाळेत जाताना घ्यावयाची काळजी व मुलींवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार कसा यावर माहिती देताना मुलींनी कोणत्याही समस्यात अडकल्यास पोलिसांना अगोदर कळविण्याचे आवाहन केले.
वाहतूक कायद्याचे पान करावे : बशीर मुल्ला
ट्राफिक साहाय्यक पोलीस निरीक्षक बशीर मुल्ला यांनी सांगितले की, राज्यात 700 ट्राफिक पोलीस सर्वत्र देखरेख ठेवून आहेत. मुलांनी कायद्याचे पालन करत गाडी हाकावी. शाळेत पोहोचविण्यासाठी येणाऱ्या पालकांनी कायद्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यातूनच मुले शिकतात. सदैव हेल्मेट परिधान कऊनच दुचाकी चालवा तसेच मुलांनी परवान्याशिवाय रस्त्यावर गाडी फिरवू नये, अशी सूचना केली.
लिटल फ्लावर ऑफ फिझस हायस्कूलचे विद्यार्थी रिया कवी, अखिल शेख, सिस्टर अनास्टिन आदीनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सचिव अर्जुन वेळीप यांनी आभार मानले.









