डॉ. बालचंद्र मुंगेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
आजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहनाची कमतरता दिसते. त्यामुळे विद्यार्थी पाठिमागे राहू लागले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या त्या क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजेत. विद्यार्थ्यातील कलागुण आवड ओळखून योग्यवेळी मार्गदर्शन केले पाहिजेत. असे विचार डॉ. बालचंद्र मुंगेकर यांनी काढले.
एससी-एसटी गॅझेटेड ऑफिसर चॅरिटेबल फौंडेशनतर्फे शनिवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर एल. आर. कांबळे, एम. डी. कांबळे, डी. एम. चिक्क्यागोळ आदि उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थीनिंनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला. मान्यवरांचा म्हैसुरी फेटा व स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
डॉ. मुंगेकर पुढे म्हणाले लहान मुलांना विश्वासात घेवून त्यांच्या सोबत मित्रत्वाच नात निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुले जवळ येतील आणि त्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळेल मुलांनी केवळ 90 टक्के घ्यावेत अशी अपेक्षा न ठेवता ती सर्वगुण संपन्न होतील या दृष्टीकोणातुन त्यांच्याकडे पाहिले पाहिजेत. कोणताही विषय सांगताना मुलांना तो सोप्या आणि साध्या भाषेत सांगितला पाहिजेत. त्यामुळे एखाध्या विषयाची आवड निर्माण होवून मुले त्यात प्राविण्य होतील असेही त्यांनी सांगितले.









