Students faced the first paper of class 12 with enthusiasm
बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे . मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर होता सावंतवाडीत राणी पार्वती देवी हायस्कूल आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयात बारावीचे केंद्र आहे. या ठिकाणी विद्यार्थी उत्साहाने बारावीच्या पहिल्या पेपरला सामोरे गेले आहेत कोविड नंतर पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा आहे कोविडमध्ये लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळे दहा मिनिटे वाढवून देण्यात आले आहेत तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रातील ब्लॉगमध्ये बसावे लागत आहे त्यामुळे जवळजवळ चार तास विद्यार्थ्यांना केंद्रावर काढावे लागत आहेत परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी पुरेपूर उपायोजना करण्यात आले आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









