मालवण | वार्ताहर –
समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा कोळंब -कातवड येथे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश कनेरकर, शिक्षिका प्रीतम पारकर, संग्राम कासले तसेच विद्यार्थी उपस्थित होते. 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा चौक जिल्हा सातारा येथे शाळा प्रवेश झाला. हा दिवस महाराष्ट्र शासनाच्यावतीने विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी मुख्याध्यापक अंकुश कनेरकर व संग्राम कासले यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाविषयी माहिती दिली. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला.









