ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
राज रावसाहेब गर्जे (22) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो या महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होता. राज आणि निरुपम जोशी एकमेकांच्या ओळखीचे होते. राजने मध्यस्थी करत निरुपम जोशी याला दुसऱ्याकडून काही पैसे उसणे घेऊन दिले होते. मात्र निरुपम हे पैसे परत देत नव्हता. उलट महाविद्यालयात तो राजला मानसिक त्रास देत होता. त्यामुळे राज तणावात होता. या तणावातूनच राजने गळफास घेऊत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात निरुपम जोशी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.








