कोल्हापूर :
नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत कमी मार्क पडतील या भीतीने विद्यार्थींने गळफास घेऊन आत्महत्या केली. संचिता लक्ष्मण कडव (वय 17, रा. वाशी नाका परिसर, कोल्हापूर) या याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
संचिता कडव ही विद्यार्थींनी शहरातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. बारावीची वार्षीक परिक्षा गेल्या काही दिवसापूर्वी झाली आहे. या परिक्षेत कमी मार्क पडतील या भितीने संचिता तणावाखाली घरात वावऊ लागली, त्यामुळे तिच्या आई–वडीलांनी तिला परिक्षेत नापास झाली. तरीदेखील चालेल पण तु परिक्षेत कमी मार्क मिळतील यांचा मनावर तणाव घेवू नको म्हणून सतत सांगत होते. तरीदेखील तिने आईवडीलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष कऊन, राहत्या घराच्या तिच्या अभ्यासाच्या खोलीच्या दरवाज्याला आतुन कडी लावून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली.








