वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-पाकिस्तान संघर्षामुळे मागील सामना अचानक स्थगित करण्यात आल्याने धक्का बसलेल्या दिल्ली कॅपिटल्सला आज रविवारी येथे होणाऱ्या रिव्हर्स लेग आयपीएल सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यावेळी दिल्लीला गोलंदाजीविषयीच्या चिंता दूर करण्याचा आणि पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून त्यांच्या प्लेऑफमध्ये प्रवेशाच्या आशा जिवंत राहतील.
गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन पराभव आणि पावसामुळे सामन्याचा निकाल न लागण्यास तोंड द्यावे लागल्यानंतर दिल्लीचा मागील सामना शेजारच्या जम्मू आणि पठाणकोटमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली. स्पर्धा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनेक परदेशी खेळाडू परतलेले नाहीत, ज्यामुळे संघात मोठे बदल करावे लागले आहेत.
11 सामन्यांत 13 गुणांसह सध्या ‘टॉप चार’च्या बाहेर असलेल्या दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने उर्वरित हंगामात परत न येण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानची सेवा मिळवण्यात दिल्ली यशस्वी ठरल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळालेला असेल. शुक्रवारी मुस्तफिजूरला राष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडून ‘ना हरकत दाखला’ मिळाला.
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्लीने घरच्या मैदानावर निराशाजनक कामगिरी केली असून या हंगामात अऊण जेटली स्टेडियमवर फक्त एक विजय, तोही सुपर ओव्हरद्वारे त्यांना मिळवता आलेला आहे. दुष्मंथा चामीरा आणि मुकेश कुमार यांचा समावेश असलेला त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग संघर्ष करत असून त्यामुळे सुऊवातीला यश मिळविण्याच्या बाबतीत मुस्तफिजूरची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे.
दिल्लीच्या फलंदाजी विभागातही सातत्य दिसलेले नाही. अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिसचे पुनरागमन हे प्रोत्साहन देणारे असून अभिषेक पोरेल आणि कऊण नायरसह वरची फळी त्यांच्या अलीकडील संघर्षांना मागे टाकून गुजरातविरुद्ध आक्रमक खेळ करू शकेल, अशी आशा संघ व्यवस्थापन बाळगून असेल. या हंगामात संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज के. एल. राहुल आणि कर्णधार अक्षर यांच्याकडे महत्त्वाची भूमिका असेल.
11 सामन्यांत 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला गुजरात या हंगामात चांगली कामगिरी करत आला आहे. जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हे पुन्हा संघात सामील झाले आहेत. मात्र बटलर चेन्नई सुपर किंग्सविऊद्धच्या शेवटच्या लीग सामन्यासाठी उपलब्ध नसेल. शुभमन गिल, बी. साई सुदर्शन आणि बटलर अशी एक जबरदस्त वरची फळी त्यांच्याकडे आहे. गुजरातची गोलंदाजीही तितकीच प्रभावी असून प्रसिद्ध कृष्णा 20 बळींसह आयपीएलच्या बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे, तर मोहम्मद सिराज (15 बळी) आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर (14) यांनीही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे,
संघ-दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), मुस्तफिजूर रहमान, अभिषेक पोरेल, कऊण नायर, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, दर्शन नळकांडे, त्रिपुराना विजय, दुष्मंथा चमीरा, फाफ डू प्लेसिस, टी. नटराजन, अजय जाधव मंडल, मानवंथ कुमार एल., माधव तिवारी.
गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, निशांत सिद्धू, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद अर्शद खान, आर. साई किशोर, जयंत यादव, करीम जनात, बी. साई सुदर्शन, दासून शनाका, शाहऊख खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, जेराल्ड कोएत्झी, गुरनूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, कुलवंत खेजरोलिया, राहुल तेवतिया, रशिद खान.









