माझा आक्षेप नेर्तृत्वाच्या भुमिकेवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर असून आणि कार्यकर्त्यांनी मांडलेली मते महत्वाची नाहीत असे कसे काय राजू शेट्टी म्हणू शकतात असा सवाल स्वाभिमानी शेतकऱी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
बुलढाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काही किरकोळ मतभेद असून तसे वाद प्रत्येक पक्षात आहेत. त्यामुळे हा वाद महत्वाचा नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यावर राजू शेट्टींच्या या प्रतिक्रियेनंतर रविकांत तुपकर यांनी नाराजी व्यक्त करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पहा VIDEO : नेर्तृत्वाच्या भुमिकेवर आणि कार्यपद्धतीवर माझा आक्षेप- रविकांत तुपकर
ते म्हणाले “राजू शेट्टी साहेबांची प्रतिक्रिया आत्ताच मी ऐकली. ते म्हणाले रविकांत तुपकर काय म्हणाले हा काय म्हत्वाचा विषय नाही. तसेच माझे आणि बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्याचेही ते म्हणाले. मी सांगतो…माझा जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर वाद नाही. तसेच हा विषय महत्वाचा नाही असे आपण म्हणू कसे शकता.”
पुढे बोलताना ते ते म्हणाले “मी पक्षाच्य़ा बैठकीमध्ये मनमोकळेपणाने बोललो. माझा आक्षेप हा पक्षप्रमुखांवर नाही तर त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. तसेच नेर्तृत्वाच्या भुमिकेबद्दल आहे. माझ्या आक्षेपाला फाटे फोडण्यासाठी काहीतरी उठवले जात आहे. माझा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोणत्याही कार्यकर्त्यांशी वाद नाही.” असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “गेली 20 वर्षे मी आणि माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेऊन ही संघटना वाढवली आहे. शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी असे म्हणंन म्हणजे चुकिची गोष्ट आहे. मी पुन्हा सांगतो माझा आक्षेप पक्षाच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आहे. तसेच त्यांच्या भुमिकेवर आहे. आणि मी माझ्या भुमिकेवर ठाम आहे.” असेही ते म्हणाले.








