अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात दुरुस्ती
बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीसाठी जानेवारीअखेरर्पंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत रेशनकार्ड दुरुस्ती करून घेण्यासाठी लाभार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात दुरुस्तीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. मागील काही महिन्यांपासून ठप्प असलेल्या रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना मिळाली आहे. नाव कमी करणे, नवीन नाव जोडणे, पत्त्यात बदल, मोबाईल आदी कामे केली जातात. अनेकांना रेशनकार्ड दुरुस्तीअभावी शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागले होते. मात्र आता दुरुस्ती कामाला प्रारंभ झाल्याने दिलासा मिळाला आहे. गॅरंटी योजनांमुळे रेशनकार्डची मागणी दुपटीने वाढली आहे. विशेषत: बीपीएल रेशनकार्डची मागणी अधिक आहे. मात्र सरकारने नवीन रेशनकार्डची कामे थांबविली आहेत.
नवीन रेशनकार्डधारकांच्या पदरी निराशा
जिल्ह्यात अंत्योदय, बीपीएल, एपीएल कार्डधारकांची संख्या मोठी आहे. दरम्यान शासकीय योजना आणि पंच गॅरंटीसाठी बीपीएल कार्डसाठी अनेकांची धडपड सुरू आहे. दरम्यान अनेकांना रेशनकार्डच्या दुरुस्तीअभावी शासकीय योजनांपासून दूर रहावे लागत होते. त्यामुळे रेशनकार्डची दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी होत होती. सद्यस्थितीत रेशनकार्ड दुरुस्ती कामाला प्रारंभ झाला आहे.









