Ayurveda Health Tips : आयुर्वेद हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे, जे जगातील सर्वात प्राचीन औषधी पद्धतींपैकी एक मानले जाते. आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान, जे आपल्याला शतकानुशतके शरीरावर योग्य उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. आयुर्वेदानुसार संध्याकाळी ७ नंतर काहीही खाऊ नये. रात्री उशिरा जेवल्यामुळे व्यक्तीचा वात असंतुलित होतो. म्हणजे काही काळानंतर व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत होऊ लागते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रात्रीच्या वेळी तुम्ही टाळले पाहिजे. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

नियमित व्यायाम करणारे तसेच ज्यांना वजन कमी करायचे आहे असे लोक आपल्या आहारात दररोज सॅलडचा समावेश करतात.केवळ असे लोकच नाही तर अनेकांना कोशिंबीर खाल्याशिवाय पोटभर जेवल्याचा आनंद घेता येत नाही. हे जरी खरे असले तरी रात्री ते खाणे टाळावे.यामागील कारण म्हणजे कोशिंबीर थंड आणि कोरडी असते ज्यामुळे व्यक्तीमध्ये वात दोष वाढतो. पोट फुगणे, गॅस,पाण्याची कमतरता, अस्वस्थता, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात.रात्रीच्या जेवणानंतर आपल्याला चांगली झोप हवी असेल तर सॅलड खाणे टाळा.

रात्रीच्या जेवणात गव्हापासून बनवलेले पदार्थ टाळावेत. कारण गहू हे असे धान्य आहे जे पोटासाठी जड असते आणि ते पचायला वेळ लागतो. रात्री गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होतात जे आरोग्यासाठी चांगले नसतात.

जेवणाला चव आणण्याचे काम मीठ करते. मात्र जेवणात मीठाचा वापर नकळत जादा झाला तर ते जेवण खाण्य़ायोग्य होत नाही. संध्याकाळी ७ नंतर मीठ खाऊ नये. मीठ शरीरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढवते.त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.

अनेकांना जेवणात दही असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. मात्र दही हे नेहमी सकाळी खावे. रात्री खाऊ नये. कारण रात्री दही खाल्ल्याने तुमच्या शरीरात कफ आणि पित्त दोष वाढतो.ज्यामुळे सर्दी आणि खोकला, सांधेदुखी, मळमळ आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते दह्याऐवजी ताक पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

रात्री हाॅटेलला जेवण्यासाठी गेल्यावर आपण रोटी ऑर्डर करतो. आणि जेवणाचा आनंद घेतो. मात्र मैद्यापासून बनवलेली रोटी पचायला जड असते. यामुळे पोट खराब होते. मैदा हा आतड्यांना चिटकून बराचवेळ राहू शकतो. यामुळे चयापचय मंदावतो आणि पचनक्रिया बिघडते.









