मुंबई
सेनलब इंडस्ट्रीज या मल्टीबॅगर समभागाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना तब्बल 850 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. 9 एप्रिल 2020 रोजी 25 रुपये इतकी असणारी समभागाची किंमत मुंबई शेअरबाजारात बुधवारी 255 रुपयांवर पोहोचली होती. तीन वर्षांमागे या समभागामध्ये एखाद्याने 1 लाख रुपये गुंतविलेले असतील तर त्यांना आजच्या घडीला 9 लाख 90 हजार रुपये परताव्यारूपी मिळाले आहेत.









