मुंबई :
जीएमआर पॉवर अँड अर्बन इंफ्रा या समभागाने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एक महिन्याच्या कालावधीत हा समभाग जवळपास 100 टक्के इतका वाढला आहे. सोमवारच्या शेअर बाजारातील सत्रामध्ये कंपनीचा समभाग इंट्राडे दरम्यान 46 रुपयांवर व्यवहार करत होता. सोमवारी समभाग जवळपास 10 टक्के वधारला होता. तर 4 दिवसांच्या सत्रामध्ये समभाग 39 टक्के इतका वाढला आहे.









