शेवटच्या दिवशी 103 पट प्रतिसाद प्राप्त
वृत्तसंस्था/ मुंबई
सौंदर्य आणि ग्राहकसेवा संदर्भातील अॅप आधारीत प्लॅटफॉर्म कंपनी अर्बन कंपनी लिमिटेड यांच्या आयपीओला शेवटच्या दिवशी दमदार प्रतिसाद मिळाला होता. शुक्रवारी शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी हा आयपीओ 103.63 पट सबक्राईब केला होता. पात्रता धारक संस्थांत्मक खरेदीदारांनी 140 पट आयपीओ सबस्क्राईब केला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 74 पट तर रिटेल गुंतवणूकदारांनी 39 पट आयपीओ सबस्क्राईब केला होता. अँकर गुंतवणूकीच्या माध्यमातून कंपनीने 854 कोटी रुपये उभारले आहेत. 98 ते 103 रुपये प्रति समभाग अशी आयपीओची किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कंपनीबद्दल जाणु काही
भारताशिवाय कंपनी आपला व्यवसाय संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, सऊदी अरेबिया या सारख्या देशातही करते. स्वच्छता, पेस्ट कंट्रोल, इलेक्ट्रीक कामे, प्लंबीग, कार्पेट्री, उपकरणे सेवा व दुरुस्ती, रंगकाम, केस रचना, सेवा, मसाज या सारख्या सेवा कंपनी पुरविते. 17 सप्टेंबरला आयपीओ सुचीबद्ध होणार आहे.









