उपमुख्यमंत्री फडणवीस, खा.सुप्रियाताई सुळे यांना निमंत्रण
Strong preparations for the 43rd session of the Marathi Press Conference
मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड, पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख व अध्यक्ष शरद पाबळे यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनाची निमंत्रण दिले. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांनाही समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी सुरू असून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यां मध्ये आल्या आहेत. राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ करत आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी









