मडगाव : गोवा पर्यटन खात्याच्या सौजन्याने तसेच मडगाव शिगमोत्सव समिती तर्फे शनिवार दि. 18 मार्च रोजी मडगाव शहरात शिगमोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यंदा शिगमोत्सव भव्य स्वरूपात करण्याच्या दृष्टीने शिगमोत्सव समिती कार्यरत झाली आहे. शिगमोत्सव समिती तर्फे सोमवारी सत्यनारायण महापूजा करण्यात आली. या पूजेचे यजमानपद नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व सौ. दीपा दामोदर शिरोडकर यांनी भुषविले होते. सत्यनारायण महापूजेला मडगाव शिगमोत्सव समितीचे आमदार उत्हास तुयेकर, माजी आमदार दामू नाईक, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, नगरसेविका रोनिता आजगांवकर, नगरसेवक श्री. वरक, नगरसेवक कामिलो बार्रेटो, नगरसेवक महेश आमोणकर, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, अनिल रहेजा, सुबोध गोवेकर, गणेश वेळीप, अरूण रायकर, सत्यविजय नाईक, तसेच इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावून तीर्थ-प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर समितीचे विविध पदाधिकारी व इतरांनी पिंपळकट्ट्यावर जाऊन श्री दामबाबाचे दर्शन घेतले. आज बुधवारी जागेश्वराला सूर-रोट अर्पण केले जाणार आहे. यंदा मडगाव शहरात रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धा होणार आहे. होली स्पिरीट चर्च ते मडगाव नगरपालिका इमारत पर्यंत शिगमोत्सवाची मिरवणूक निघणार आहे. मध्यतरी मडगाव शहरातून शिगमोत्सव व कार्निव्हालचे आयोजन फातोर्ड्यात केले जात असे. यंदा कार्नैव्हाल व शिगमोत्सवाच्या मार्गात बदल करण्यात आला व पुन्हा एकदा मडगाव शहरात आयोजन करण्यात येणार आहे.
Previous Articleमाशेल येथील रस्त्यावरील मासळीविक्रेत्यांचे स्थलांतर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









