व्यापक जनआंदोलनचा वनहक्क व संवर्धन कृती समितीचा इशारा; उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांना निवेदन
राधानगरी/ महेश तिरवडे
राधानगरी येथील प्रादेशिक वनक्षेत्रपाल कार्यालय स्थलांतरित न करणे संदर्भात उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांना राधानगरी परिसर वनहक्क व संवर्धन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या राजर्षी शाहूकालीन इमारतीमध्ये अनेक वर्षे प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय कार्यरत आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदरची जागा अपुरी आहे अशी सबब पुढे करून सदरचे कार्यालय गैबी नाक्याच्या पाठीमागे संरक्षित सागाच्या व निलंगिरी जंगलामध्ये स्थलांतरित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. परंतु हे करीत असताना तेथील झाडांची कत्तल करून या ठिकाणी 30 गुंठे जागेत नवीन इमारत बांधून येथे कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मात्र राधानगरी तालुक्यातील सामान्य जनतेच्या व स्थानिक रहिवासी यांच्या अडचणी लक्षात न घेता सदरचे कार्यालय गैबी येथे बांधण्याचा घाट घातला आहे, सदरचे कार्यालय राधानगरी पासून ६ किलोमीटर असल्याने गोरगरीब शेतकरी व जनतेची गैरसोय होणार आहे, अनेक वर्षे राधानगरी येथे कार्यान्वित असलेले आताच का अडचणीचे वाटते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, येथे असलेले कार्यालय आहे त्याच ठिकाणी नूतनीकरण किंवा नवीन बांधल्यास तालुक्यातील अनेक लोकांची सोय उपलब्ध होईल, तालुक्यातील इतर सर्व कार्यालये मुख्यालयात असताना फक्त हेच कार्यालय गैबी येथे का, गैबी येथे उभारण्यात येणार असलेले हे प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय स्थलांतरित न करणेबाबत निर्णय रद्द न झाल्यास राधानगरी तालुक्याच्या नागरिकांच्या व स्थानिकांच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा राधानगरी परिसर वन हक्क व संवर्धन समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे, या संदर्भात आम,प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले आहे,
यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्रा, पी एस पाटील, फेजीवडे माजी सरपंच बशीर राऊत, राधानगरीचे माजी उपसरपंच रमेश पाटील(बचाटे), माजी शिवसेना तालुका अध्यक्ष तानाजी चौगले, विक्रम पालकर, पप्पू म्हापसेकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते