बैठकीत शेतकऱयांचा एकीचा सूर
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोडमुळे शेतकऱयांची सुपीक जमीन जाऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. शिवाय याआधीच बेळगाव परिसरातील शेतकऱयांची शेती रस्त्यांच्या विकासकामांसाठी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत रिंगरोडसाठी एक इंचसुद्धा जमीन देणार नाही, असा निर्णय मुचंडी येथील हनुमान चौकात घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
रिंगरोडच्या विरोधात शेतकऱयांनी आवाज उठवून एकत्रितपणे लढा दिला पाहिजेत. शिवाय तीव्र आंदोलन छेडण्यासाठी गावोगावी जागृती केली पाहिजेत. याआधीच बेळगाव परिसरातील शेतकऱयांची शेती गेली आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी भूमीहीन झाले आहेत. अशा परिस्थितीत रिंगरोडचा घाट उधळून लावला पाहिजेत, असे विचार बैठकीत शेतकऱयांनी मांडले. रिंगरोडला विरोध दर्शविण्यासाठी प्रथमतः शेतकऱयांनी हरकती नोंद केल्या पाहिजेत. शिवाय शेतकऱयांची एकी दर्शविण्यासाठी एकत्रितपणे लढा देऊन रिंगरोडला प्रखर विरोध करून रिंगरोडचा घाट हाणून पाडला पाहिजेत, असे विचारही या बैठकीत मांडण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण,
ऍड. एम. डी. पाटील, देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष उदय पाटील यासह परशराम पाखरे, सिद्धार्थ भातकांडे, मारुती कुंडेकर, सोमनाथ मोदगेकर, यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.









