.5 रिश्टर स्केल तीव्रता, गुलमर्गमध्ये केंद्र
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी रात्री 9 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे. तातडीने जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जातो. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपाचे जोरदार धक्के पाहून लोक घराबाहेर पडले. दिल्ली, नोएडा, फरिदाबाद, गुऊग्राम, गाझियाबादसह आसपासच्या शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच उत्तर प्रदेश, हरियाणातही लोकांना भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवल्याचे सांगण्यात आले.









