प्रतिनिधी,कोल्हापूर
अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधात प्रदेश काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तालुका, जिल्हा ते राज्यपातळीवर टप्प्या टप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली. केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरही याचा निषेध होत असल्याचेही आमदार कदम यांनी सांगितले.
आमदार कमद पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यावरील ही कारवाई असंविधानीक आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहूल गांधी यांनी सुमारे चार हजार किलोमिटर अंतराची काढलेल्या पदयात्रेमुळे त्यांची लोकप्रियता देशात वाढू लागली आहे. राहूल गांधींचा आवाज दाबण्यासाठीच खोटी कारवाई केली असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज देशात वाढती महागाई, वाढती बेरोजगारी आणि शेती मालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे जनता संतापली आहे. केंद्रातील भाजपा सरकार विरोधात लोकांच्यात तिव्र नाराजी पसरली आहे. देशात निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच भाजपा सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन लोकांचे दुर्लक्ष करत आहेत. तसेच या केंद्रीय यंत्रणांद्वारे विरोधकांना संपविण्याचाही कुटील डाव भाजपाकडून सुरू असल्याचा आरोपही आमदार कदम यांनी केला.
ते म्हणाले, आजपर्यंत काँग्रेसने कधीच जातीयतेचे राजकारण केलेले नाही. सर्व जातींशी समता बंधुता राखली आहे. आज देशातील ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यापैकी तीन राज्यात ओबीसीचे मुख्यमंत्री आहेत. मात्र राहूल गांधींनी ओबीसींचा आपमान केल्याचा कांगावा करत ओबीसींनाही यामध्ये ओढले जात आहे. देशातील लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचे षडयंत्रही भाजपाकडून सुरू आहे. याला वेळीच आवर घालण्यासाठी आणि राहूल गांधीवरील खोटया कारवाईच्या विरोधात जनतेला सोबत घेवूनच आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आमदार कमद यांनी सांगितले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, अॅड. गुलाबराव घोरपडे, सरलाताई पाटील, संजय पवार-वाईकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









