Strike of non-teaching staff from February 20
2 फेब्रुवारी 2023 पासून राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. 14 फेब्रुवारी पासून हे आंदोलन अधिकच पेटलेले असून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लंच टाईम मध्ये निदर्शने केली.15 फेब्रुवारी ला काळ्या फिती लावून काम केले तर 16 फेब्रुवारी ला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. बुधवारी उपमुख्यमंत्र्यांसोबत राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या बैठकीत विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन ही सरकार कडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यापुढे 12 वी परीक्षा काळातही आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक संप 100 टक्के यशस्वी झाला.मुंबई विद्यापीठासह SNDT महिला विद्यापीठ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप केला. कर्मचाऱ्यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी न करता विद्यापीठ महाविद्यालयाच्या गेटपाशी आंदोलन केले. राज्यसरकार कडून मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन मिळत नसल्याने आज सोमवार पासून बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय श्री पंचम खेमराज महाविद्यालया च्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला आहे.तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपेक्षा करत असल्याचा आरोप श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील युनिट प्रमुख श्री ज्ञानेश्वर अंकुश तळकटकर युनिट चे अध्यक्ष श्री सुधाकर वंजारे यांनी युनिट सावंतवाडी यांच्याकडून 20 फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे या आंदोलनाची झळ 21 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या 12 वी च्या परीक्षाणा बसेल पण विध्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला कर्मचारी नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आडमुठी भूमिका घेणारे सरकार जबाबदार आहे असा इशारा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
- या आहेत मागण्या *
- सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा GR पुनर्जीवीत करा.
- 10-20-30 लाभाची योजना लागू करा.
3.सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्या.
4.शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा. - 2005 नंतर च्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
- 1410 विद्यापीठ कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्या.
- सातव्या वेतन आयोगाची अंबलबजावणी करा.
- सावंतवाडी / प्रतिनिधी