जय भीम संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेडकर गल्ली, मजगाव येथील युवकाचा खून करणाऱया संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. त्यांना जामीनही मंजूर करू नये, या मागणीसाठी जय भीम युवक मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
गुरुवार दि. 30 जून रोजी यल्लेशाप्पा शिवाजी कोलकार (वय 37) या युवकाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप राजू कोलकार (वय 32), कुमार संतोष राजंगळी (वय 19), रवी गंगाप्पा गुळेदकोप्प (वय 25), प्रदीप निंगाप्पा कोलकार (वय 24), शिवकुमार चंद्रकांत माने (वय 22, सर्व रा. आंबेडकर गल्ली, कलमेश्वरनगर, मजगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
यापुढे अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिसांनी आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आर. एस. कोलकार, आर. व्ही. चलवादी, एम. के. कोलकार, के. एस. कोलकार, डी. एस. कोलकार, बी. एल. कांबळे, एस. एस. मेत्री, यु. एस. कोलकार, ए. एस. कोलकार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









