लोणावळा / प्रतिनिधी :
सामाजिक जीवनात किशोर आवारे हे चांगले काम करत होते. दीन दुबळय़ाची आणि सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी त्यांची तळमळ असायची. अशा कार्यकर्त्यांची झालेली हत्या ही निंदनीय आहे. या हत्या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही. जे कोणी आरोपी असतील मारेकरी असतील, त्यांना कडक शासन झालेच पाहिजे. यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.
तळेगाव दाभाडे येथे पालकमंत्री पाटील यांनी मयत किशोर आवारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सांत्वन करताना चंद्रकांत पाटील भावूक झाले होते. या व मोकळी करून दिलेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे आदी उपस्थित होते. आवारे यांच्या मातोश्री सुलोचनाताई आवारे, पत्नी विद्या आवारे, भाऊ रवींद्र आवारे, मुलगी प्रियांका आवारे, मामा बाळासाहेब काकडे, रामदास काकडे, गणेश काकडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.
किशोर आवारे यांच्या नातेवाईकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिलेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे आदी उपस्थित होते. आवारे यांच्या मातोश्री सुलोचनाताई आवारे, पत्नी विद्या आवारे, भाऊ रवींद्र आवारे, मुलगी प्रियांका आवारे, मामा बाळासाहेब काकडे, रामदास काकडे, गणेश काकडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. तर किशोरभाऊ गरिबांचे कैवारी होते. आमचे ते दैवत होते. आमच्या भाऊंना न्याय द्या, अशी मागणी स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या अध्यक्ष संगीता डुबे यांनी केली.








