जत :
जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्त्या केली गेली. माणुसकीला काळिमा फसणारी ही घटना असून पोलिसांनी आरोपाविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जत शहरासह तालुक्यातील विविध गावात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा दरम्यान करण्यात आली.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शाळकरी मुलींनी कोंतेबोबलाद येथे अहमदनगर – विजयपूर राष्ट्रीय महामार्ग काही तास रोखून धरला. शासनाने मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस कायदा करून मुलींना संरक्षण द्यावे, पुन्हा कोणत्याही मुलीवर अत्याचार होता कामा नये याची खबरदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी कोंतेबोबलाद येथील शाळकरी मुलींनी प्रशासनाकडे केली. शिवाय, उमदी, दा†रबडची, संख, करजगी, व्हसपेठ येथेही ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद करून अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
गुरुवारी चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेने जत तालुक्यासह जिल्हा हादरून गेला. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय 45, रा. करजगी) याला उमदी पा†लसांनी अटक केली. जत तालुक्यातील सर्वपक्ष, संघटनानी बंद व मोर्चाची हाक ा†दली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जत शहरातील थोरली वेस येथील शाही मशीदपासून लोखंडी पूल, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती ा†शवाजी पेठ मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
यावेळी अनेक नेते, पदाधिकारी, नागरिकांनी मनोगत व्यक्त करत माणुसकीच्या नावाला काळिमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. शिवाय, हा खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वांनी केली. प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
माजी सभापती सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे मन्सूर खतीब, भाजपचे डॉ. रवींद्र आरळी, सांगली बाजार सा†मतीचे सभापती सुजय शिंदे, आरपीआयचे संजय कांबळे, संतोष मोटे, डॉ. ममता तेली, डॉ. ा†वद्या नाईक, शा†फक इनामदार, मकसूद नगारजी, अण्णा ा†भसे, सद्दाम अत्तार, रमजान नदाफ, इमरान गवंडी, ा†दनकर पतंगे, अकील नगारजी, ा†वक्रम ढोणे, युवराज ा†नकम, राजू यादव, आदीसह सर्वपक्षीय पदा†धकारी, नागा†रक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
- जत पूर्व भाग कडकडीत बंद
पूर्व भागातील संख येथे गावातून ा†नषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. नराधम आरोपीला फाशीची ा†शक्षा द्यावी. आरोपीला कठोरात कठोर ा†शक्षा द्यावी. या मागणीचे ा†नवेदन अप्पर तहसीलदार रोहीणी शंकरदास यांना ा†दले. ा†जल्हा पा†रषद प्राथा†मक शाळेत घटनेचा ा†नषेध केला.
दरीबडची येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मूकमोर्चा काढण्यात आला. कडकडीत बंद पाळण्यात आला. कोंतेवबोबलाद येथे अहमदनगर–ा†वजापूर महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून घटनेचा ा†नषेध केला. उमदी पोलीस ठाण्याचे उपा†नरीक्षक बंडू साळुंखे यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन आरोपीवर योग्य ती कारवाई करू, अशी आश्वासन गावकऱ्यांना ा†दले. शालेय ा†वद्यार्थ्यांनी आरोपीवर फाशीची कारवाई व्हावी. या मागणीचे ा†नवेदन ा†दले.








