स्ट्रेच मार्क्स म्हणजे नक्की काय?
वजन अचानक वाढल्यास वा अचानक कमी झाल्यास,जेव्हा तुमची त्वचा ताणली जाते त्या ठिकाणी त्वचेचं कोलेजन कमी होतं, त्यामुळे तुमच्या त्वचेवर खालच्या बाजूला स्कार्स अर्थात निशाणी यायला लागते. तुमची त्वचा जर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेली तर अशा प्रकारचे निशाण दिसू लागतात, ज्याला स्ट्रेच मार्क्स असं म्हटलं जातं.
.व्यायाम
व्यायाम केल्याने बऱ्याच अंशी स्ट्रेच मार्क्स दूर होण्यासाठी मदत होते. वास्तविक नियमित व्यायामाने तुमच्या मांसपेशी टोन्ड होतात आणि स्ट्रेच मार्क्स आपणहून निघून जातात. त्यासाठी रोज नाही तर आठवड्यातून निदान चार दिवस सिटप, योगा, स्विमिंग इत्यादी व्यायाम करणं आवश्यक आहे.
अंड्याचा पांढरा बलक
स्ट्रेच मार्क्सवर अंड्याचा पांढरा भाग लावा. हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने पोटाजवळचा भाग स्वच्छ करा. त्यानंतर ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा.
बटाट्याचा रस
बटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.
कोरफडीचा गर
स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर नियमित लावा.सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.
तेल
तेलाचा मसाज नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल. याकरिता नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा मसाज करणं फायदेशीर ठरत.
हे लक्षात घ्या
स्ट्रेच मार्क्स मुळापासून कधीच काढून टाकता येत नाही. पण त्यांना कमी करता येतं. तुम्ही थोडी मेहनत केल्यास, स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









