बेळगाव प्रतिनिधी – शुल्लक कारणावरून कॅम्प येथील एका मुलावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अनंतशयन गल्लीजवळ हि घटना घडली असून या घटनेनंतर काहि काळ तणाव निर्माण झाला होता. फरान धारवाडकर (वय 15) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारसायकलवरून जाताना तरुणांच्या दोन गटात अंबाभुवनजवळ झालेल्या वादावादीनंतर हि घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी, खडेबाजारचे ए सीपी ए.चंद्राप्पा खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकार्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. जखमी मुलाची भेट घेऊन घटनेची माहिती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. हा हल्ला कोणी केला? याचा रात्री उशिरापर्यंत उलगडा झाला नाहि. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









