नगरसेविका वैशाली भातकांडे यांचा पुढाकार : नागरिकांतून समाधान व्यक्त
बेळगाव : कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरील पथदीप गेल्या महिन्याभरापासून बंद होते. मात्र, त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी पुढाकार घेत सोमवार दि. 27 रोजी दुरुस्ती केली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरील पथदीप गेल्या महिनाभरापासून बंद होते. त्यामुळे ब्रिजवरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना अंधारातून ये-जा करावे लागत होते. त्यामुळे पथदीपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. पण, त्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले होते. ही बाब गांभीर्याने घेत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यानुसार सोमवारी पथदीपांची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









