साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांची तत्परता. वीज खात्याकडून काम पूर्ण
डिचोली/प्रतिनिधी
साखळीतील भाजप कार्यालयासमोर देसाईनगर येथे जाणाऱया रस्त्यावर एका बाजूने वळणावरच रस्त्यालगत असलेले दोन वीजखांब हटवून त्यांचे इतर ठिकाणी स्थलांतर केल्याने या वळणावरून ये जा करणाऱया वाहनांना होणारा त्रास कमी झालेला आहे. या कामासाठी साखळीचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी समस्या लक्षात येताच लगेच वीज खात्याकडे पाठपुरावा करून सदर खांबांचे स्थलांतरण करून घेतले.
भाजप कार्यालयासमोरून देसाईनगर येथे जाणाऱया सदर रस्त्यावर दिवसभरात मोठय़ा संख्येने लहान मोठय़ा गाडय़ांची वर्दळ सुरूच असते. वरून खाली येताना डाव्या बाजूने रस्त्यालगतच असलेले दोन खांब डाव्या बाजूने वळण घेण्यास अडथळा करीत होते. हा विषय नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या निदर्शनास या भागातील नागरिकांनी आणून देताच त्यांना लगेच साखळीतील वीज खात्यांकडे सदर वीज खांब स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली.
वरी÷ वीज अधिकारी, अभियंत्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या काहीच दिवसांमध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामानंतर वळणाचा ओबडधोबड बनलेला रस्ताही दुरूस्त करून वाहतुकीस तयार करण्यात आला.
या कामामुळे आता वळणावर उभी राहणाऱया वाहनांमधील चालकांना वरून येणारी वाहने सहजपणे दृष्टीस पडतात. केवळ या रूंद करण्यात आलेल्या वळणाच्या रस्त्यावर वाहने पार्क करायला देऊ नयू, अशी मागणी वाहनचालक व लोकांकडून होत आहे.
लोकांच्या समस्या लक्षात येताच त्या युध्दपातळीवर सोडविण्यासाठी आपण सदैव तत्परतेने प्रयत्न करीत आहे. साखळीतील लोकांना सर्व प्रकारची सेवा चांगली मिळावी आणि समस्या येऊ नये, यासाठी आपण नगराध्यक्ष या नात्याने कार्य करीत आहे. लोकांनीही नगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या मांडण्यात मागे राहू नये, असे आवाहन नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी केले.









