हॉटेल्साया टाकाऊ अन्नासाठी उडतेय झुंबड : वाहनालकांना धोकादायक, अपघातांया वाढत्या घटना
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची या बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील पट्टय़ामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनेक मांसाहारी आणि शाकाहारी हॉटेल्स असल्याने या हॉटेलच्या शेजारी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. बेळगाव-बाची मार्गावर ये-जा करणाऱया अनेक वाहनचालकांना या कुत्र्यांपासून अपघात होण्याचे प्रकार वाढले असून अनेक जणांना दुखापतीही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधितांनी याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहे. बेळगाव-बाची या मार्गावरील सिंधी कॉलनी, विजयनगर, हिंडलगा, आंबेवाडी क्रॉस, सुळगा, कल्लेहोळ क्रॉस, उचगाव, तुरमुरी, बाची या प्रत्येक गावाशेजारी मांसाहारी हॉटेल्स मोठय़ा प्रमाणात आहेत. या हॉटेलमधील मांसाहारी शिळे अन्न इकडेतिकडे टाकल्याने अन्नावरती भटकी कुत्री तुटून पडत असतात. आणि यामुळे रस्ता पार करताना बिनधास्तपणे त्यांची हालचाल रस्त्यावरून इकडेतिकडे सुरू असते. यामुळे प्रवासी ये-जा करत असताना वाहनांच्या समोर ही कुत्री येत असल्याने मोठ-मोठे अपघात याठिकाणी घडत आहेत. वाहनचालकांना यामध्ये दुखापतींबरोबरच वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याच्या अनेक घटना या मार्गावर घडल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉटेलमालकांनीसुद्धा हॉटेलच्या सभोवती शिळे अन्न इकडे तिकडे न टाकता त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. य् ाा मार्गावरील हॉटेलच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनांना तर धोका आहेच. याबरोबरच नागरिकांच्यावरती ही कुत्री बिनधास्तपणे हल्ला करत असल्याचेही अनेक प्रकार दिसून आले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका या कुत्र्यापासून अनेकवेळा निर्माण झालेला आहे. या रस्त्याशेजारी अनेक गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची राहती घरे असल्याने या घरातील नागरिकांनाही याचा नाहक त्रास या कुत्र्यापासून सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा दुर्गंधीच दुर्गंधी
य् ाा रस्त्यावर अपघातामध्ये मरण पावलेली अनेक भटकी कुत्री रस्त्याच्या दुतर्फा पडलेली आढळून येतात. सदर कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने कुत्र्यांची कुजण्याची प्रक्रिया होऊन याठिकाणी दुर्गंधीही सुटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधितांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यी मागणी होत आहे.









