महापालिकेने जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पार्किंग तसेच व्यावसायिकांसाठी सोय करण्यात आली. तरी त्याठिकाणी आता भटकी जनावरे ठाण मांडून बसू लागली आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच या जनावरांनी ठाण मांडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. जवळपास सहा महिन्यांहून अधिककाळ यासाठी लावण्यात आला. याचबरोबर इतर खुल्या जागांमध्ये वाहनांचे पार्किंग तसेच चहा टपरीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सध्या याठिकाणी पार्किंग केले जात आहे. याचबरोबर व्यवसायही काहीजणांनी थाटले आहेत. मात्र त्याच परिसरात भटकी जनावरे ठाण मांडल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.महानगरपालिकेने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.