कॅन्टोन्मेंटकडून भटकी जनावरे पकडण्याची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरात भटक्मया जनावरांची संख्या वाढल्याने जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र कॅन्टोन्मेंटने ही मोहीम सुरू केली असल्याने आता कॅन्टोन्मेंट हद्दीतील जनावरे महापालिका हद्दीत भटकत आहेत. त्यामुळे महापालिका आणि कॅन्टोन्मेंटच्यावतीने संयुक्तरित्या ही मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
महापालिका व्याप्तीमधील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि भाजी मंडईमध्ये भटकी जनावरे फिरताना दिसतात. बसथांबे आणि चौकांमध्ये ठाण मांडून वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेने भटकी जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. पण अलीकडे महिन्यापासून ही मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे विविध चौकात भटकी जनावरे निदर्शनास येत आहेत. कॅन्टोन्मेंट परिसरातदेखील भटकी जनावरे वाढल्याने कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.
कॅन्टोन्मेंटमध्ये फिरणारी जनावरे पकडण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. दोन दिवसात दहा जनावरे पकडून गो-शाळेत दाखल करण्यात आली. पण कारवाईच्या धास्तीने कॅन्टोन्मेंट परिसरातील जनावरे आता महापालिका व्याप्तीमध्ये सोडण्यात येत आहेत. त्यामुळेच शहरातदेखील ही संख्या वाढली आहे. महापालिका आणि कॅन्टोन्मेंटने एकाचवेळी ही मोहीम राबवून भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.









