प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या दहा दिवसांपूर्वी हिंडाल्को ब्रिजजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखीचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलिसांनी सुमारे 40 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दि. 24 जुलै रोजी सुमारे 40 वर्षीय अनोळखीला 108 रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांचा उपयोग न होता बुधवार दि. 2 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात येत असून संबंधितांनी 9480804107 या क्रमांकावर माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









