मुलांवर ताण येऊ नये म्हणून..
घरानंतर शाळेत मुलांना शिस्त लागावी म्हणून पाठविले जाते. सामाजिक पद्धती शिकविण्याचे काम शाळाच करते. परंतु शाळेत ही मुले स्वत:चे जीवन बिघडविण्यासारखे काही शिकू लागल्यास काय होईल याचा विचार करून पहा. विदेशातील एका शाळेत असेच घडत आहे.
एकीकडे शाळेत मुलांना कशापद्धतीने वागावे हे शिकविण्यात येते. तर दुसरीकडे एका शाळेकडून मुलांना सिगारेट ओढण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका शाळेत हा अजब प्रकार सुरू आहे. क्वीन्सलँडच्या अरेस्थुसा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना धूम्रपान करण्यासाठी रितसर ब्रेक दिला जात आहे.
अरेस्थुसा कॉलेजमध्ये प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांना स्मोक ब्रेक म्हणजेच सिगारेट ओढण्यासाठी ब्रेक देण्यात येत आहे. वेगवेगळ्या वयाच्या 50 विद्यार्थ्यांना या यादीत सामील करण्यात आले आहे. हे विद्यार्थी वॅप घेण्यासाठी छोटा ब्रेक घेतात, याचमुळे त्यांच्यासाठी एक खास क्षेत्र तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये देखील एका शाळेत विद्यार्थ्यांना स्मोकिंग ब्रेक दिला जातो. शाळेत सुमारे वर्षभरापूर्वी हा नियम लागू करण्यात आला होता. शाळेनुसार पालकांच्या अनुमतीद्वारे हा नियम लागू करण्यात आला आहे. तर काही पालकांना या नियमाबद्दल आक्षेप आहे.
सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणासोबत खुली आणि पारदर्शक धोरणं अंमलात आणत आहोत. अनेक मुले शाळेत निकोटीन डिपेंडेंसी लीव्हचा अर्ज घेऊन येतात. अशा स्थितीत शाळेकडून त्यांचे शिक्षण योग्यप्रकारे व्हावे म्हणून अशाप्रकारचा ब्रेक देण्यात आला आहे. शाळेकडून सिगारेट पुरविली जात नाहीत, असे शाळांकडून सांगण्यात आले. मुलांना जर धूम्रपानाचे व्यसन लागले असल्यास ते कुठेतरी करणार, अशा स्थितीत सुरक्षित ठिकाणी त्यांनी धुम्रपान करणे चांगले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.









