जगातील प्रत्येक देश आणि भागात विवाहाच्या अनेक प्रथा-परंपरांचे पालन केले जाते. काही परंपरा अत्यंत विचित्र असतात. भारतात विवाह सोहळ्यावेळी बूट्स पळविण्याची पद्धत चर्चेत असते. अशाच प्रकारे रोममध्ये एका अशा प्रथेचे पालन केले जाते, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर चकित व्हायला होते. रोम येथील विवाहात वधूसोबत अजब प्रथेचे पालन केले जाते.

इटलीची राजधानी रोममध्ये होणाऱ्या विवाहात अनेक प्रकारच्या परंपरांचे पालन केले जाते. यात वधू अन् वर दोघांच्याही पुटुंबांचे लोक सहभागी होत असतात. विवाहात अनेक प्रकारचे अजब खेळ खेळले जातात. रोममध्sय विवाहाच्या दिवशी वधूचे अपहरण करण्याची प्रथा आहे. वराचे मित्रच वधूचे अपहरण करतात आणि वधू देखली अत्यंत आनंदाने त्यांच्यासोबत जात असते. यानंतर जोपर्यंत मित्रांना खंडणी दिली जात नाही तोवर वधूला तिच्या नवऱ्याजवळ जाऊ दिले जात नाही.
रोमच्या विवाहसोहळ्यांमध्ये पालन केले जाणाऱ्या प्रथेचे नाव ब्राइम नॅप्पिंग आहे. यात नवऱ्यासमोरच त्याच्या नववधूला उचलून घेतले जाते. अपहरण खरे वाटावे म्हणून वराचे मित्र स्वत:कडे शस्त्रही बाळगातत. विवाहसोहळ्यात उपस्थित पाहुणे अन् वरासमक्षच वधूचे अपहरण केले जाते. यानंतर वधूला सोडण्याच्या बदल्यात खंडणी मागितली जाते. खंडणी दिल्यावरच वधूची मुक्तता केली जाते.
खंडणीदाखल काय मागतात?
प्रथेत वराचे मित्र वधूला सोडण्याच्या बदलयात खंडणी मागत असतात. खंडणीदाखल बहुतांशकरून मद्याच्या बाटल्या मागितल्या जात्यात किंवा सर्वांसमोर वराला स्वत:च्या प्रेमाची कबुली द्यावी लागते. यामागील कारण मौजमस्ती करणे हेच असते. जगातील अनेक देशांमध्ये वधूचे अपहरण करण्याची प्रथा आहे. काही देशांमध्ये वधूला सोडण्याकरता पैशांची मागणी देखील केली जाते.









