पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होते नववधूची पाठवणी
भारतात विवाहासाठी लाल रंगाला शुभ मानले जाते, याचमुळे खास दिवशी वधू लाल रंगाच्या पोशाखात सजते अणि लाल रंगाच्या पेहरावातच तिची पाठवणी हेते. भारतीय संस्कृतीत पांढरा आणि काळा रंग शुभ समयी चांगला मानला जात नाही. याचमुळे या रंगाचे कपडे त्यावेळी परिधान केले जात नाहीत. परंतु भारतात एका ठिकाणी वधू विवाहाच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा पेहराव करते.
एका गावात वधूला तिचे आईवडिलच पांढरा पेहराव करायला लावतात आणि त्याच पेहरावात तिची पाठवणी करत असतात. मध्यप्रदेशच्या मंडला जिल्ह्यातील भीमडोंगरी गाव आदिवासीबहुल आहे. येथे विवाहानंतर युवतीला पांढऱ्या रंगातच पाठविले जाते. यावेळी लोक देखील पांढरेच कपडे घालतात. वधूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीमागे खास मान्यता आहे. या गावात गौंडी धर्माचे लोक राहतात, या धर्मात पांढऱ्या रंगाला अत्यंत शुभ मानले जाते. याचमुळे येथील आईवडिल स्वत:च्या मुलींना विवाहावेळी पांढऱ्या रंगाचा पेहराव करायला लावतात आणि त्याच कपड्यांमध्ये पाठवणी देखील करतात.
पांढऱ्या रंगाच्या कपड्यांसाब्sात येथे सप्तपदींचा विधी वधूच्या घरातच होतो. परंतु केवळ 4 फेरे वधूच्या घरात केले जातात. यानंतर उर्वरित तीन फेरे वराच्या घरी केल्यावर पूर्ण केले जातात.









