न्हावेली / वार्ताहर
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयल आरोस येथे मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी के.विद्याधर शिरसाट यांच्या अकराव्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस, विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस व पारिजात फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने कथाकथन स्पर्धा आयोजित केली असून .स्पर्धेसाठी विषयाचे बंधन नाही.प्रत्येक गटातून एक विद्यार्थी प्रशालेतून पाठवावयाचा आहे.२८ जुलै २०२३ पर्यंत आपली नावे ९४०३३६७८५६ या व्हॉट्स ॲप नंबर वर पाठवावीत.स्पर्धेसाठी प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना स्मृती चषक व रोख रक्कमेची पारितोषिक दिली जाणार आहेत.
ही स्पर्धा तीन गटात असून, मंगळवार दि.१ ऑगस्ट रोजी स.१० :०० वा स्पर्धा सुरू होईल.पहिला गट पहिली ते चौथी यासाठी पारितोषिक प्रथम क्रमांक -५०१/- द्वितीय -३०१/- तर तृतीय -२०१/- उत्तेजनार्थ दोन बक्षिसे ,पाचवी ते सातवी हा दुसरा गट असून प्रथम – ७०१/- द्वितीय – ५०१/- व तृतीय – ३०१/- उत्तेजनार्थ दोन तर तिसरा गट आठवी ते दहावी यासाठी प्रथम -१००१/-, द्वितीय – ७०१/- तृतीय -५०१/- व उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दिली जाणार आहेत.यात पहिल्या गटासाठी चार मिनिट,दुसऱ्या गटासाठी पाच मी. व तिसऱ्या गटासाठी ६ मिनिट वेळ दिला जाईल.तरी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेण्याचे आवाहन विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक श्री सदाशिव धुपकर यांनी केले आहे.









