वार्ताहर/ आंबोली
आंबोलीत पावसाळी वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली . हजारो पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला . कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी ५५ पोलीस कर्मचारी, पाच पोलीस अधिकारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले होते . हा सर्व बंदोबस्त सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. तर आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार दत्तात्रय देसाई स्वतः पोलीस व्हॅनने पेट्रोलींग करीत होते. पोलीसांनी आंबोली चेकपोस्ट वर राहून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करीत होते . तसेच दंड त्यांनी वसूल केला. तर रस्त्यावरून जाताना धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांवरही कारवाई केली. पर्यटकांची गर्दी पाहून फॉरेस्ट नाका येथून वाहने मुख्य धबधब्या पर्यत सोडण्यात येत होती. तर काही पर्यटक पायी धबधब्या पर्यत जात होते. सर्वच पाँईट वर पर्यटकांची तुफान गर्दी दिसत होती. तर वाहनांची संख्या ही तुफान होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









