बेळगाव : शहरात जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे. आदर्शनगर महालक्ष्मी कॉलनीत मागील महिन्याभरापासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यामुळे एलअँडटी कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. एकीकडे एलअँडटी चोवीस तास पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे शहरातील पाणी गळतीची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठ्यापूर्वी शहरातील पाणी गळती थांबवा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांतून होत आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाळ्यात शहरात पाण्याची समस्या निर्माण होते. काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दरम्यान एलअँडटीकडून पाणी बचतीसाठी आवाहन केले जाते. मात्र सध्या होत असलेल्या पाणी गळतीकडे दुर्लक्ष झाले आहे.
Previous Articleमुलींच्या मिनी ऑलिम्पिकमध्ये बेळगावची बाजी
Next Article अंगणवाडीतील बालविकास समित्या निष्क्रिय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









