मालवण -प्रतिनिधी
मालवणात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्ससीन नौका दाखल झाल्या आहेत. अशा अवैध पर्ससीन नौकांना किनाऱ्यावरच रोखा. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने मत्स्य विभागाला दिला आहे. यासंबंधीचे निवेदन मंगळवारी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्रीधर अलगिरी यांना सादर करण्यात आले.









