लांजा :
महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरची प्रक्रिया तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी लांजा तालुका शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन गुरुवारी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना देण्यात आले.
महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महावितरण विभागाकडून संपूर्ण तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. या गोष्टीला आमच्या पक्ष संघटनेचा ठाम विरोध आहे. स्मार्ट मीटर बसवण्याबाबत महावितरणने जोरजबरदस्ती केल्यास किंवा ती कृती
न थांबवल्यास या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.








