सेन्सेक्स 107 अंकांनी प्रभावीत : अदानी, स्टेट बँक व हिरो मोटोचे समभाग घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर चालू आठवड्यातील मंगळवारच्या सत्रात पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 107 तर निफ्टीचा निर्देशांक 26.45 अंकांनी प्रभावीत झाला आहे. मंगळवारी अदानी एंटरप्राईजेसचे समभाग 2.88 टक्क्यांनी प्रभावीत झाले. याउलट स्टेट बँक व हिरोमोटो कॉर्पचे समभाग वधारुन बंद झाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 106.98 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 65,846.50 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 26.45 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,570.85 वर बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये मंगळवारी पॉवरग्रिडचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.62 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासोबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, सनफार्मा, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयटीसी, टीसीएस, टाटा मोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांच्या प्रवासात महिंद्राचे समभाग हे 1.93 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच विप्रो, बजाज फायनान्स, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि एनटीपीसीचे समभाग हे वधारुन बंद झाले.
या क्षेत्रांची स्थिती
पीएसयू बँक आणि औषध क्षेत्र वगळता अन्य सर्व क्षेत्रात निर्देशांक घसरणीत राहिला. निफ्टीमधील धातू क्षेत्र 1.17 टक्क्यांच्या घसरणीसोबत बंद झाला. निफ्टीतील पीएसयू बँक 3.37 टक्क्यांनी वधारला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपचा निर्देशांक वधारुन बंद झाला.
रुपया घसरणीत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये नकारात्मक स्थिती होती. डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी प्रभावीत होत 82.84 वर बंद झाला. या अगोदर रुपया 82.74 वर बंद झाला आहे.
बाजाराची नजर पतधोरण बैठकीकडे
मंगळवार 8 ऑगस्टपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वीमासिक पतधोरण बैठकीला प्रारंभ झाला आहे. यामुळे आताच्या घडीला आरबीआय रेपोदरात वाढ करणार का दर स्थिर ठेवणार याकडे गुंतवणूकरांचे लक्ष असल्याने बाजारात दबावाची स्थिती राहिल्याने मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकात घसरणीची नेंद करण्यात आली आहे.









