होंडा पंचायतीच्या ग्रामसभेत मुद्दा गाजला, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या सुक्राप्ट पेपर मिल कंपनीमुळे होंडा व इतर परिसरातील जनतेला प्रदुषणाला सामोरे जावे लागते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे असा मुद्दा उपस्थित करून पंचायतीच्यावतीने पुढाकार घेऊन सदर कंपनीचे प्रदुषण त्वरित बंद करावे अशी जोरदार मागणी आज दि 23 रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सदर कंपनीचे उत्पादन प्रक्रिया सुरू असताना कर्णकर्कश आवाज व जिवघेणी दुर्गंधी सर्वत्र पसरत असल्याने होंडा पंचायतीचे सर्व प्रभाग, पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील काही भाग, हरवळे, मोर्ले या भागातील जनतेच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्मयता व्यक्त केली.गेल्या दोन तीन वर्षांपासून सदर प्रकार सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. उग्र स्वरूपाची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना घरांची दारे व खिडक्मया बंद करून लॉकडाऊन अवस्थेत दिवस काढावे लागतात असा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला.
सदर कंपनीच्या प्रदुषणाचा त्रास पिसुर्ले येथिल विद्यालय तसेच शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळे मुले आजारी पडण्याची प्रमाण वाढली असल्याचे मत शिक्षक भैरू झोरे यांनी उपस्थित केला. सदर कंपनीमूळे या परिसरातील विहिरीतील पाणी प्रदुषित झाले असल्याचे पोस्तवाडा भागातील काही नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे सदर प्रदुषणाचा धोका लक्षात घेऊन होंडा पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन सदर कंपनीवर कायदेशीर कारवाई करून सदर प्रदुषण बंद करावे अशी जोरदार मागणी केली.
त्याच प्रमाणे होंडा परिसरातील दुकाने परप्रांतीयांच्या ताब्यात जात आहेत. त्याचा परिणाम स्थानिक दुकानदारावर होत आहे. या संबंधी पंचायतीने परप्रांतीयांना दुकाने चालण्याचा परवाना देऊ नये अशी मागणी होंडा तिस्क भागातील काही दुकानदारांनी केली.
होंडा पंचायतीचा कारभार गेल्या काही वर्षांपासून होंडा बसस्थानकावरील अपुऱया जागेतून चालत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामसभा किंवा इतर स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यास अडथळा निर्माण होत आहे याची दखल घेऊन पंचायतीचा कारभार नवीन इमारती मधून सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सुरवातीला सरपंच शिवदास माडकर यांनी स्वागत करुन नागरिकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन कंपनीचे प्रदुषण बंद करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.त्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सह्याचे निवेदन द्यावे असे सांगितले. पंचायतीचे सचिव मुला वरक यांनी मागील सभेचा वृत्ता?त वाचून पंचायतीतर्फे सुरू असलेल्या व नियोजित कामांची माहिती दिली.
या वेळी व्यासपीठावर उपसरपंच रेशीम गावकर, पंच निलिमा शेटय़?, स्मिता मोटे, सुविधा माडकर, प्रमोद गावडे, कृष्णा गावकर, निलेश सातर्डेकर, दिपक गावकर आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी कार्यालयातर्फे निरिक्षक म्हणून नारायण गावस हे अधिकारी उपस्थित होते.









