अनगोळ मुस्लीम जमातीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : भाग्यनगर, सातवा क्रॉस येथील (सीटीएस क्र. 3869) जमिनीवर अनगोळ येथील कोतवाल कुटुंबीय व मुस्लीम जमातीचा हक्क आहे. ही जागा मुस्लीम स्मशानभूमी म्हणून राखीव ठेवण्यात आली आहे. परंतु, काही व्यक्तींनी ही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला असून जमिनीवर इतरांची नावे चढविण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार हाणून पाडावा, अशी मागणी अनगोळ येथील मुस्लीम जमातीच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कुरुंदवाड सरकारने 1814 मध्ये इनाम स्वरुपात कोतवाल कुटुंबीय व जमातीला दिली होती. ही जागा स्मशानासाठी राखीव ठेवली होती. परंतु, ही जागा हडपण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. कोतवाल कुटुंबीयांकडे रितसर जागेची कागदपत्रे असतानाही जागा नावावर करून घेण्यासाठीचा अर्ज बेळगाव तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश बजावून जागा इतर कोणाच्याही नावे करू नये, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच या जागेची वक्फ बोर्डाकडेही नोंद आहे. यावेळी मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अॅड. अब्दुल मुल्ला, अॅड. आय. ए. मुल्ला, अय्याज कोतवाल, दादा कोतवाल, मोहम्मदसाब कोतवाल, वासीम निसारअहमद कोतवाल यासह इतर उपस्थित होते.









