आमदार जयंत आसगावकर यांची मागणी
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील थकीत वेतनाची बिलं ही प्रलंबित पडलेली आहेत. आणि प्रत्येकवर्षी बिले पाठवली जातात, निधी नाही म्हणून परत येतात. परत फेरप्रस्ताव सादर करावा लागतो. सादर केलेल्या फेरप्रस्तावातील बिलांमध्येही त्रुटी काढल्या जातात. हे चुकीचे आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या कार्यालायत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत संघटनांच्या मागण्या मांडण्यात आल्या अशी माहिती यांनी आमदार जयंत आसगावकर दिली.
पुढे ते म्हणाले, पे युनिट आणि लेखाधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक मागणी केली जाते. शाळांचे ऑडीट करणे, पे फिक्सेशन करणे अशा कामांसाठी आर्थिक मागणी केली जाते. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उद्घाटपणे उत्तरे दिली जात आहेत. याला प्रवृत्ती आळा बसण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनांची बैठक ही प्रत्येक तीन महिन्याला शिक्षण अधिकाऱ्यांसोबत, सहा महिन्याला उपसंचालकांसोबत झाली पाहीजे. या संदर्भात पाचही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, वेतन अधिक्षक यांची एका ठिकाणी घ्यावी अशी मागणी आमदार जयंत आसगांवकर यांनी केली.








