ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात आज, मंगळवारी रमजान ईद (Eid) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मात्र याचदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये नमाजानंतर मशिदीबाहेर सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली आहे. (jammu kashmir eid ul fitr stone pelting on security forces jawans outside mosque at anantnag)
दरम्यान, राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर, जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आता ताजी घटना समोर आली आहे. जिथे ईदच्या नमाजनंतर मशिदीबाहेर दगडफेक (Stone throwing) करण्यात आली आहे. यावेळी नागरिकांनी मशिदीबाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा दलांना लक्ष्य करत दगडफेक करण्यात आली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील (district) एका मशिदीबाहेर ईदच्या नमाजानंतर काही लोकांनी दगडफेक केली आहे. तोंडाला बांधून काही समाज कंठकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी (police) प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात सुरक्षा दलाची तैनात वाढवण्यात आली आहे.
राज्यस्थानातही हिंसाचार
दुसरीकडे, राजस्थानच्या जोधपूरमध्ये 2022 च्या ईदपूर्वी सोमवारी रात्री उशिरा दोन समुदायांचे लोक समोरासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी (Fighting) झाली. जोधपूरमधील जलौरी गेट चौकात स्वातंत्र्यसैनिकाच्या पुतळ्यावर इस्लामी ध्वज फडकवण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान दगडफेकीपर्यंत झाले. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. सध्या संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण असून, हा सण जातीय सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिसरातील तणाव पाहता इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.